जितेंद्र जाधव, प्रतिनिधी
बारामती, 23 एप्रिल : नुकतेच भारताने लोकसंख्येच्या बाबतीत चीनलाही मागे टाकलं आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बारामतीकरांना मोलाचा सल्ला दिला आहे. “देवाची कृपा, देवाची कृपा अस म्हणू नका एक किंवा 2 अपत्यांवर थांबा, असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी यापूर्वी देखील अनेकदा अपत्य किती असावीत यावरुन वक्तव्य केली आहेत. यासाठी ते शरद पवार यांचंही उदाहरण देतात.
तुमच्या शहरातून (पुणे)
दोनपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना सवलत बंद : अजित पवार
इथून पुढे ज्यांना 2 पेक्षा जास्त अपत्य असतील त्यांना कसलीच सवलत द्यायची नाही, असं माझ्या मनात आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. तेव्हा आम्ही घाबरत घाबरत 2 अपत्य असतील तर थांबवा असा निर्णय घेतला. त्यातून पण आम्ही मार्ग काढला. जर पहिली डिलिव्हरी झाली आणि दुसऱ्या डिलिव्हरी दरम्यान जुळी मुलं झाली तरी ती तीनच होतात ना. परंतु, जर पहिल्याला जुळं झालं तर मात्र दुसरी डिलिव्हरी होऊ द्यायची नाही, असा निर्णय आम्ही घेतला. ज्यांना राजकारणात यायचं आहे ते बरोबर काटेकोर नियोजन करतात. 2024 साली भारताची 150 कोटी लोकसंख्या होईल. जगातील 2 देशांची लोकसंख्या तीनशे कोटी आहे कस व्हायचं? बारामती येथे कपड्याच्या दुकानाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
Video : लोकसंख्येवरुन अजित पवार यांची जोरदार फटकेबाजी.#Ajitpawar #baramati pic.twitter.com/RrDtP32kVG
— News18Lokmat (@News18lokmat) April 23, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.