पुणे, 19 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगती या पुस्तकाचा दुसरा भाग प्रकाशीत झाला आहे. या पुस्तकात शरद पवार यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अनेक गौप्यस्फोट केले आहेत. यावरून चांगलचं राजकारण तापलं होतं. आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र या चर्चेवर पडदा पडला होता. परंतु पुन्हा एकदा फडणवीस यांनी या पुस्तकावरून निशाणा साधल्यानं हा विषय चर्चेत आला आहे. फडणवीसांच्या टीकेला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच लोकसभा जागा वाटपावर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
फडणवीसांना टोला
टीआरपी कसा वाढवावा हे शरद पवार यांच्याकडून शिका असा खोचक टोला फडणवीस यांनी लगावला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीस यांनी शरद पवार यांना कॉम्प्लीमेंट दिल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी त्यांनी लोक माझे सांगाती या पुस्तकात पवारांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानांवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. लोक माझे सांगाती हे पुस्तक निट वाचा त्यात 100 गोष्टी चांगल्या आहेत. उद्धव ठाकरेंबद्द या पुस्तकात फक्त नोटस काढण्यात आल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
मोठी बातमी! लोकसभा जागा वाटपात ठाकरे गट दोन पाऊलं मागं? संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
जागा वाटपावर प्रतिक्रिया
लोकसभेच्या जागावाटपावर प्रतिक्रिया देताना मात्र सुप्रिया सुळे यांनी सावध भूमिका घेतली. आम्ही 18 जगांवर लढणार असून, आमचे 18 आमदार लोकसभेत जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं होतं. संजय राऊत यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देणं सुप्रिया सुळे यांनी टाळलं आहे. मला राऊत काय बोलले किंवा समान जागा वाटपाबाबत काहीही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.