मुंबई, 19 मे : आगामी लोकसभा निवडणूक आणि राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे. सर्वच पक्षांनी कंबर कसल्याचं पहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून देखील लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या चाचपणीला सुरुवात झाली आहे. शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दुपारी चार वाजता मातोश्रीवर दक्षिण मुंबई लोकसभा विभाग क्रमांक 12 च्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला कुलाबा, मलबार हिल, मुंबादेवी विधानसभा मतदार संघातील पुरुष आणि महिला पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
रविवारीही बैठक
तर दुसरीकडे रविवारी दुपारी चार वाजता ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं आहे. रविवारी होणाऱ्या बैठकीला घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द मतदार संघातील पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा समन्वक, विधानसभा संघटक, उपविभाग प्रमुख, उपविभाग समन्वयक, शाखाप्रमुख, शाखा समन्वयक, माजी नगरसेवक यांना बैठकीला उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
पवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा वार, आता राष्ट्रवादीकडून पलटवार
जागावाटपावरून बिघाडी?
आगामी महानगर पालिका आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने मोर्चे बांधणी करत बैठकांचं सत्र सुरु केल्याचं पहायला मिळत आहे. ठाकरे गटाकडून महाविकास आघाडीत लोकसभेच्या वीस जागांची मागणी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते समसमान जागा वाटपावर ठाम आहेत. लोकसभेच्या जागावाटपाचा निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीने एक समिती गठीत गेली आहे. ज्यामध्ये तीन्ही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. लोकसभा जागा वाटपावरून महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.