लोणावळा, 01 एप्रिल : लिंगाणा किल्ल्यावरून दरीत कोसळून ट्रेकरचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक दुर्घटना घडलीय. लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवरून सहाशे फूट खोल दरीत कोसळून तरुणाचा मृत्यू झाला. खोल दरीतील मृतदेह बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर शिवदूर्ग रेस्क्यू पथकाला पाचारण करण्यात आलं. त्याने दरीतून मृतदेह बाहेर काढला.
लोणावळ्यातील लायन्स पॉइंटवरून तरुणी दरीत पडला होता. खेमा बबन घुटे असं त्याचं नाव आहे. ही घटना नेमकी कशी घडली याबाबत माहिती समजू शकली नाही. तरुण दरीत पडल्याचं समजताच शिवदुर्ग रेस्क्यू पथकाला बोलावण्यात आले. त्यांनी रोपच्या सहाय्याने खोल दरीत शुक्रवारी सायंकाळी तरुणाचा शोध घेतला. तेव्हा त्याचा मृतदेह आढळून आला होता.
बागेश्वर बाबाच्या दरबारात नेऊ शकला नाही पती, पत्नीने उचललं टोकाचं पाऊल
तुमच्या शहरातून (मुंबई)
लिंगाणा किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेलेल्या ६२ वर्षीय ट्रेकरचा आठवड्याच्या सुरुवातीलाच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. पनवेलमधील ग्रुप लिंगाणा किल्ल्यावर गेला होता. त्यावेळी चक्कर येऊन दरीत पडल्यानं अजय काळे यांचा मृत्य झाला होता. ते जवळपास ४०० फूट खोल दरीत पडले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.