नवी दिल्ली, 21 एप्रिल : देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीत नेमकं चाललंय काय असा प्रश्न आजच्या घटनेमुळे निर्माण झाला आहे. दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत एक महिला जखमी झाली आहे. गोळीबाराची सगळी घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये आज दुपारी एका वकिलाने महिलेवर गोळीबार केला. वकिलांच्या वेशात हा हल्लेखोर आला होता होता. कोर्टाच्या आवारातच या हल्लेखोराची आणि जखमी महिलेची झटापट झाली. त्यानंतर पिस्तुल काढून त्याने 3 राऊंड फायर केले.
दिल्लीतील साकेत कोर्टामध्ये गोळीबार pic.twitter.com/GQGstIQ1gx
— ram rajesh patil (@RamDhumalepatil) April 21, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.