पुणे, 16 मे : पुण्यात अनधिकृत व्यावसायिकांची वाढत्या अतिक्रमणांवर, महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईला सुरूवात केली आहे, मात्र ही कारवाई करताना, उपायुक्त माधव जगताप यांच्या रुद्रावतारामुळे व्यावसायिकांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलं आहे. एप्रिल महिन्यात फर्ग्युसन परिसरात कारवाई करताना, उपायुक्त माधव जगताप यांनी ताळतंत्र सोडत सगळे स्टॉल लाथेने उडवून लावलेत.
परिसरातल्या कॅमेऱ्यात ही घटना कैद झाल्यानंतर, एकवटलेल्या व्यावसायिकांनी माधव जगतापांच्या या कृतीचा निषेध केला. तसंच महापालिका आयुक्तांकडे रितसर तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली आहे.
5 एप्रिलची घटना असून महिनाभर माधव जगताप यांच्याकडून वेगवेगळ्या मार्गाने व्हिडीओ देऊ नये, म्हणून दबाव येत असल्याने व्यावसायिकांवर प्रचंड भीती निर्माण झाली होती. अखेर एकत्रित येत या व्यावसायिकांनी माधव जगताप यांच्या विरोधात तक्रार केली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
सुप्रिया सुळेंकडूनही कारवाईची मागणी
दुसरीकडे राष्ट्रवादीच्या नेत्या आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही या उपायुक्तांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी’, असं ट्वीट सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
पुणे महापालिका उपायुक्त माधव जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्चर्य वाटले. महापालिकेचे अधिकारी हे संवेदनशील असायला हवेत. त्यांना तळागाळातील जनतेच्या कष्टाची जाण असायला हवी. सदर अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला हवी.@PMCPune pic.twitter.com/vKt6f0wkBI
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.