प्रियांका माळी, प्रतिनिधी
पुणे 26 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीवर मात करत यश मिळवलं आहे. त्यापैकीच एक पुण्यातील सरस्वती विद्यामंदिर रात्रशाळेची विद्यार्थी रेश्मी पांचाळ आहे. रेश्मी पांचाळ हीने घरची परिस्थिती बेताची असताना जिद्द आणि आत्मविश्वासाने त्यावर मात करून रात्रशाळेत शिक्षण घेत घवघवीत यश प्राप्त केले आहे. तिचीही कहाणी सर्वांना प्रेरणा देणारी आहे.
रात्र शाळेत पहिला नंबर
तुमच्या शहरातून (पुणे)
रेश्मी भास्कर पांचाळ ही मुळची कोकणातील आहे. वडीलांच्या डोक्यावर कर्जचा डोंगर झालेला. रेश्मी हिचे वडील सुतारकाम करून गेली पाच वर्ष आपला संसार सांभाळताहेत. मात्र, रेश्मीने आपलं रात्रशाळेत शिक्षण सुरू ठेवलंच अन् दिवसभर मॉलमध्ये रिसेप्शनिस्टची नोकरी करत वडिलांनाही हातभार लावला. तीने कॉमर्स माध्यमांत सरस्वती विद्यामंदिर रात्र शाळेतून पहिले येत तब्बल 79.33 टक्के गुण मिळवले आहेत.
सीए बनणे ध्येय
कामावर असताना जेव्हा वेळ मिळेल तेंव्हा मी पुस्तक काढून अभ्यास करत असे. मला मॉलमधील सहकाऱ्यांकडून यासाठी प्रोत्साहन मिळत होते. बाबांचे कष्ट पाहूनच मला हे ध्येय गाठण्याची प्रेरणा मिळाली. सीए बनणे हे माझे ध्येय आहे. मी सुट्टीच्या दिवशी किंवा कधी कधी रात्र रात्र जागून काढत मी अभ्यास केला. आमच्यावर ओढवलेल्या परिस्तिथीमिळे मात्र आमच्या कुटुंबाला अगदी जवळ आणले आहे आणि ही गोष्ट सकारात्मक असल्याचे रेश्मीने सांगितले.
HSC Result : वडील दुकानात कामाला, ट्युशनची फी भरायलाही नव्हते पैसे, सोहमचं यश पाहून घरचे रडले
तर तिचा भाऊ मयूर यानेही रात्र शाळेत अभ्यास करून नुकताच बारावी उत्तीर्ण झाला आहे. दिवसा वडिलांना मदतीचा हात देणाऱ्या मयुरला 55 टक्के गुण मिळाले. मयूरचे जास्त लक्ष कामात असायचे आणि वडीलांचे काम कमी करता येईल याकडे त्याने लक्ष दिले असल्याचेही रेश्मीने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.