सिंधुदुर्ग, 2 मे : मुंबई गोवा महामार्गावर वागदे येथील वक्रतुंडसमोर लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या बोलेरो टेम्पोला भिषण अपघात झाला. हा अपघात मंगळवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला. या अपघातात जवळपास 12 जण गंभीर जखमी झाले तर 33 लोक किरोकळ जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या घटनेची दखल मंत्री रविंद्र चव्हाण यांनी घेतली आहे. या अपघाताबद्दल ट्विटकरुन चव्हाण यांनी माहिती दिली.
लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या वाहनाच्या वागदेजवळ झालेल्या अपघाताबाबत त्वरित अपडेट्स घेतले आहेत. १२ जण गंभीर तर ३३ जण किरकोळ जखमी आहेत. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात अॅडमिट करण्यात आले आहे. त्यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांना यश यावे ही प्रार्थना ! (१/२)
— Ravindra Chavan (@RaviDadaChavan) May 2, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.