मुंबई, 13 मे : एनसीबी मुंबई झोनलचे माजी डायरेक्ट समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने छापा टाकला. बेहिशीबी मालमत्ता प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. एनसीबीच्या रिपोर्टनंतर सीबीआयकडून ही कारवाई केली जात आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचारादेखील गुन्हा दाखल केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे समीर वानखेडे अडचणीत येण्याची शक्यता आहे. दरम्यान, समीर वानखेडेच्या CBI घरझडतीत 18 हजार रुपये रोख सापडल्याची माहिती आहे. या संदर्भात समीर वानखेडे यांनी न्यूज 18 शी संवाद साधला.
समीर वानखेडे यांच्या विरोधात चौकशी करण्यासाठी एक टीम तयार करण्यात आली होती. ही टीम सविस्तर तपास करत होती. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचं क्रूझ ड्रग्स प्रकरण, माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावायाचं प्रकरण आणि आणखी असे काही प्रकरणं होती. त्या प्रकरणांप्रकरणी टीमकडून चौकशी करण्यात आली. या टीमने समीर वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा अहवाल तयार केला होता. हा अहवाल एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आला होता. अखेर या प्रकरणी सीबीआयकडून कारवाई केली जात आहे. गोरेगावच्या इम्पिरिअल टॉवरच्या फ्लॅटची CBI नं झडती घेतली होती. वानखेडे हे मुंबई NCB चे मंकी झोनल संचालक होते. वानखेडे यांच्याशी संबंधित 3 ठिकाणी CBI नं सर्च ऑपरेशन केलं होतं.
मी कारवाईला सामोरं जायला तयार : वानखेडे
तुमच्या शहरातून (मुंबई)
सीबीआयच्या कारवाईनंतर समीर वानखेडे यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला आहे. आपण कायदा मानणारे असून मी कारवाईला सामोरं जायला तयार असल्याचे वानखेडे यांनी सांगितलं. CBI नं समीर वानखेडे यांच्या 4 मालमत्तांची कागदपत्रे जप्त केली आहेत. ही मालमत्ता मी सर्व्हिसमध्ये येण्याच्या अगोदरची असल्याचे ते म्हणाले. देशभक्त होण्याची ही शिक्षा असल्याचंही समीर वानखेडे बोलले.
वाचा – ‘..म्हणून कर्नाटकमध्ये भाजपचा पराभव’, शरद पवारांनी केलं काँग्रेसचं अभिनंदन
समीर वानखेडे यांची वानखेडे क्रूझ ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई
समीर वानखेडेच्या नेतृत्वाखाली NCB टीमने 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबई बंदराजवळ एका क्रूजवर छापेमारीची कारवाई केली होती. त्यावेळी बॉलिवुडचा किंग खान शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. आर्यन खान तीन आठवडे तुरुंगात होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. मागच्यावर्षी मे महिन्यात NCB ने आर्यन खानसह सहाजणांवरील ड्रग्स बाळगल्याचे आरोप हटवले होते.
समीर वानखेडे यांच्यावरही काही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दिल्लीमधून एनसीबीच्या एका टीमने तपास आपल्या हाती घेतला. वानखेडेंची बदली केली. या प्रकरणाशी संबंधित एक रिपोर्ट्ही समोर आला होता. त्यात आर्यन खानला जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आलं, असं म्हटलं होतं. एनसीबीच्या तपासात काही त्रुटी होत्या. पुरेसे पुरावे नसताना, तपास पुढे सुरु ठेवला. पाच डझन लोकांची जबानी नोंदवण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.