मुंबई, 12 मे : आर्यन खान प्रकरणात चर्चेत आलेले आयआरएस अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर सीबीआयनं धाडसत्र सुरू केलं आहे. वानखेडेंशी संबंधित 7 ठिकाणी सीबीआयनं धाडी टाकल्यात. यात वानखेडेंच्या बहिणीच्या घराचाही समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. भ्रष्टाचार प्रकरणात समीर वानखेडेंवर सीबीआयने गुन्हा दाखल केलाय. सोबतच वानखेडेंच्या घरी सीबीआयनं एनसीबीच्या विजिलन्स टीमने तयार केलेल्या अहवालानंतर या धाडी टाकल्या जात आहेत. आर्यन खान प्रकरणात 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप वानखेडेंवर करण्यात आलाय, यातले 50 लाख रुपये वानखेडेंनी स्वीकारले असल्याचाही आरोप करण्यात येत आहे.
आर्यन खान प्रकरणाचा तपास ज्या एनसीबी टीमनं केला होता, त्या सर्व टीमशी संबंधित देशभरातल्या तब्बल 29 ठिकाणी हे धाडसत्र सुरू करण्यात आलंय, त्यामुळे या प्रकरणात तपास करत असलेली एनसीबी अधिकाऱ्यांची टीम अडचणीत आल्याचं चित्र आहे.
या प्रकरणात सीबीआयने मुंबई रांची कानपुर दिल्ली या ठिकाणी धाडी टाकल्या. या धाडी आर्यन खान प्रकरणाचा तपास ज्या एनसीबी टीमने केला, त्या सर्व टीमवर या धाडी टाकण्यात आल्या आहेत. सीबीआयने या एनसीबी टीमवर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
समीर वानखेडे यांच्याविरोधात एनसीबीने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केल्यानंतर नवाब मलिक यांची कन्या सना मलिक शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सच और सच के सिवा कुछ भी नहीं।। असं ट्वीट सना मलिक शेख यांनी केलं आहे, तसंच त्यांनी कर्मा असा हॅशटॅगही वापरला आहे, सोबतच त्यांनी नवाब मलिक यांचा फोटोही लावला आहे.
सच और सच के सिवा कुछ भी नहीं।।#KARMA pic.twitter.com/igazRDQWR3
— Ar. Sana Malik-Shaikh (@sanamalikshaikh) May 12, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.