मुंबई, 13 एप्रिल- ater Overflowing Phobia: जगात विविध प्रकारच्या व्यक्ती असतात. त्यापैकी काही जणांना विचित्र शारीरिक, मानसिक आजार असल्याचं दिसून येतं. वैद्यकीय शास्त्रामध्ये काही आजारांवर उपचार सहज उपलब्ध आहेत. परंतु असे काही विकार आहेत, जे सामान्य नसतात. एका महिलेला असाच काहीसा विचित्र विकार आहे. तिला वाहत्या पाण्याची खूप भीती वाटते. वाहतं पाणी पाहिलं की ही महिला बेशुद्ध पडते. अर्थात तिच्या या आजारामागे भूतकाळात घडलेल्या काही घटना कारणीभूत आहेत. हा आजार बरा होण्यासाठी तिने उपचारदेखील घेतले असून, आता ती या आजारातून 80 टक्के बरी झाली आहे.
कधीकधी वॉशरूममधला टब भरला, की त्यातलं पाणी ओसंडून वाहू लागतं. खरं तर असा प्रकार तुमच्याआमच्या घरीही घडतो; मात्र ही महिला गेल्या 44 वर्षांपासून एका विचित्र फोबियाला बळी पडली आहे. कुठेही खूप पाणी वाहताना दिसलं, तर या महिलेला मानसिक धक्का बसतो. त्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने ती बेशुद्ध पडू लागते. तिच्या या भीतीला भूतकाळातली एक घटना कारणीभूत आहे.
काहीही! थुंकी, कानाचा मळ आणि नको तेच…; शरीरातील घाण विकून लाखो रुपयांची कमाई
जोरात पाणी वाहत असेल, तर बेशुद्ध पडते महिला
ही महिला युनायटेड किंग्डममधल्या बकिंगहॅमशायरमधील बीकन्सफिल्डमध्ये राहते. या महिलेचं नाव डार्सी क्राफ्ट असं असून, ती 44 वर्षांची आहे. या आजाराविषयी डार्सीने सांगितलं, `वयाच्या चौथ्या वर्षापासून मला वेगाने वाहणाऱ्या पाण्याची भीती वाटू लागली. खरं तर एकदा माझी आई आंघोळ करत असताना छत तुटून तिच्या अंगावर पडलं. त्यातून पाण्याचा वेगवान प्रवाह खाली येताना मलादिसला. या घटनेत माझ्या आईला कोणतीही इजा झाली नाही. परंतु या घटनेने माझ्या मनात घर केलं. मला वॉटर ओव्हरफ्लो फोबिया नावाचा विकार झाला. त्यामुळे असं दृश्य पाहिलं की मी बेशुद्ध पडते.`
पोहायला आवडतं, पण पाण्याचा प्रवाह पाहिला की येते चक्कर
बालपणी घडलेल्या घटनेमुळे डार्सीला पॅनिक अॅटॅक येऊ लागले. यातच नऊ वर्षांनंतर या महिलेचे आणखी दोन अपघात घडले. एकदा ती बुडता बुडता थोडक्यात वाचली. दुसऱ्या घटनेत ती बाथरूममध्ये बेशुद्ध पडली होती. डार्सी पाण्याला घाबरत नाही; पण पाण्याचा प्रवाह पाहिला की ती गोंधळून जाते. अशा स्थितीत ती बेशुद्धदेखील पडते. डार्सीने यासाठी हिप्नोटिझमची मदत घेतली आणि आता तिचा फोबिया 80 टक्के बरा झाला आहे. आता तिला पहिल्याइतका त्रास होत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.