मुंबई, 18 मे : सोशल मीडियावर सध्या एका मुलीचा स्कुटी चालवतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून यूजर्सना हसूही आवरत नाहीये. अशाप्रकारे गाडी चालवणाऱ्या मुलींना सोशल मीडियावर पापा की परी म्हणून ट्रोल केलं जातं. काही मुली तर स्कुटीवर विचित्र पद्धतीने सेल्फी आणि व्हिडिओ बनवल्यामुळेही ट्रोल झाल्या आहेत.
थेट दुकानात एण्ट्री
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये काही लोक रस्त्याच्या कडेला दुकानाबाहेर गप्पा मारताना दिसत आहेत. तेव्हाच स्कुटी चालवत ही मुलगी तिकडे येते. पार्किंगमध्ये गाडी थांबवण्याऐवजी ती थेट स्कुटी घेऊन दुकानात शिरते. दुकानातल्या सीसीटीव्हीमधून पाहिलं तर ही मुलगी स्कुटीला ब्रेकच लावत नाही, त्यामुळे स्कुटी दुकानात पूर्ण आतमध्ये जात आहे. दुकानातलं सामान पडतानाही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.