Sawali Sindewahi Nagar Panchayat Election Result : काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी होम ग्राऊंडवर अपेक्षित विजय मिळवलाय. सावली सिंदेवाहीत काँग्रेसने विजयी झेंडा फडकवलाय. सावलीत 14 तर सिंदेवाहीत 13 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय संपादन केला.
चंद्रपूर : काँग्रेस नेते आणि मंत्री विजय वडेट्टीवार यांनी होम ग्राऊंडवर अपेक्षित विजय मिळवलाय. सावली सिंदेवाहीत काँग्रेसने विजयी झेंडा फडकवलाय. सावलीत 14 तर सिंदेवाहीत 13 जागांवर काँग्रेसच्या उमेदवारांनी विजय संपादन केला. जिल्ह्यातील सहा नगर पंचायतीच्या निवडणुकांचा निकाल हाती आला आहे. जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या सावली आणि सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायतीवर काँग्रेसने बहुमत मिळविले आहे. मंत्री विजय वडेट्टीवारांच्या विधानसभा क्षेत्रातील या दोन्ही नगर पंचायतीवर विजय मिळवित वडेट्टीवारांनी आपला गड राखला आहे.
हा नगर पंचायतीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस- भाजपाची थेट लढत होणार असे बोलले जात होते. मात्र काही ठिकाणी काँग्रेसने मोठी सरशी घेतली. तर भाजपने काँटे की टक्कर दिली. जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या सावली, सिंदेवाही नगर पंचायतीवर काँग्रेसने विजय मिळवला आहे.
सिंदेवाही-लोनवाही नगर पंचायतीत काँग्रेसला 17 जागांपैकी 13 जागांवर विजय मिळलाय. भाजपने दोन जागा जिंकल्या तर अपक्ष उमेदवाराने एका जागेवर विजय मिळवला. सावलीमध्ये काँग्रेसला बहुमत मिळालंय .17 जागांपैकी काँग्रेस 14 जागांवर विजयी आणि भाजपला तीन जागांवर विजय मिळालाय.