ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी
लातूर, 21 एप्रिल: गरीब, रुग्ण, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या मदतीसाठी काही संस्था मदतीचा हात देत असतात. लातूरमध्ये अशीच एक संस्था असून विविध सामाजिक विषयांमध्ये दिशा प्रतिष्ठान मार्फत काम केले जाते. नुकतेच दिशा प्रतिष्ठानच्या वतीने दिशा दप्तर या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यामध्ये एक हजार गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले शाळकरी विद्यार्थीच मदत करणार आहेत. या माध्यमातून त्यांच्यावर सामाजिक संस्कार होणार आहेत. त्यासाठीच दिशा प्रतिष्ठानच्या वतीने दप्तर योजना सुरू करण्यात आली आहे.
दिशा फिरता दवाखाना
तुमच्या शहरातून (लातूर)
दिशा प्रतिष्ठानचा फिरता दवाखाना या उपक्रमांतर्गत दररोज लातूर जिल्ह्यातील दोन खेड्यांमध्ये रुग्णांची तपासणी केली जाते. आत्तापर्यंत तीस हजार रुग्णांची तपासणी फिरता दवाखानाच्या माध्यमातून झाली आहे. या दवाखान्याचे वैशिष्ट्य म्हणजे नुसती तपासणी न करता औषधेही पुरविली जातात. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शैक्षणिक कार्य
समाजामध्ये आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी दिशा प्रतिष्ठानच्या वतीने शैक्षणिक कार्य केले जाते. विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साधनांची उपलब्धता करून दिली जाते. आत्तापर्यंत दोन ते अडीच कोटी रुपयांची भरीव मदत दिशा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आल्याचे अभिजीत देशमुख यांनी सांगितले.
नावीन्यपूर्ण उपक्रमाची साखळी
लातूर जिल्ह्यामध्ये कोणत्याही क्षेत्रामध्ये अडचण असलेला व्यक्ती दिशा प्रतिष्ठानला संपर्क करू शकतो. त्यांची अडचण तत्परतेने सोडवणे हा दिशा प्रतिष्ठानचा मुख्य उद्देश आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर दिशा प्रतिष्ठानला मदत करतात.
Beed News: जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना इस्रोमध्ये काय आला अनुभव? पाहा Video
दिशा दप्तर योजना
दिशा प्रतिष्ठान आपल्या नाविन्यपूर्ण आणि कल्पक संकल्पनेमुळे नेहमीच समाजात कुतुहलाचा आणि उत्सुकतेचा विषय राहिले आहे. दिशा प्रतिष्ठानचा अजून एक नवीन आणि अभिनव प्रकल्प दिशा दप्तरचा शुभारंभ करण्यात आला आहे. शाळेत शिकत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना वह्या, कंपास, शूज, सॉक्स अशा उपयोगी वस्तू असलेले दप्तर देण्यात येणार आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले शाळकरी विद्यार्थीच या गरजू विद्यार्थ्यांना डोनेट करणार आहेत.
विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य यासाठी दिशा प्रतिष्ठान अहोरात्र झटत आहे. या माध्यमातून विविध सामाजिक पुरस्काराने दिशा प्रतिष्ठानला गौरविण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.