मुंबई:
एलपीजी सिलिंडरच्या (LPG Gas) दरात काल वाढ झाली. यामुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. काल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका केली आहे. आज एलपीजी, उद्या पेट्रोल-डिझेलची (Petrol Diesel) दरवाढ होईल. यामुळे कोणाचे अच्छे दिन आले आहेत यावरून ओळखता येईल असा टोला राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लगावला आहे. दरम्यान राज्याचे मदत व पुनर्वसन, इतर मागासवर्ग मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनीही भाजपवर निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुका संपत आल्याची चाहूल असे सूचक वक्तव्य त्यांनी ट्विट करत केले.
रशिया-युक्रेन युद्धामुळे पेट्रोलियम पदार्थांचे दर वाढत आहे. त्यामुळे काल (ता.१) मार्चपासून एलपीजी सिलिंडरच्या दरात १०५ रुपयांनी वाढ करण्यात आली. ही दरवाढ व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या राज्यांच्याळ विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होईल, असा अंदाज वर्तविला जात आहे. या दरवाढीवर काँग्रेस पक्षाचे (Congress Party) नेते खासदार राहुल गांधी यांनी टीका केली. त्यांचे ट्विट विजय वडेट्टीवार यांनी शेअर केले आहे. तसेच विधानसभा निवडणुका संपत आल्याची चाहूल लागली असे सूचक वक्तव्य केले आहे.
पंजाबनंतर आता उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणूकांमध्ये विजय मिऴवण्यासाठी विरोधक आणि सत्ताधीरी यांनी आपली ताकद पणाली लावली आहे. प्रचारा दरम्यान एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सध्या नेते सोडत नाहीत. त्यातच आता एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ केल्याने भाजप सरकारवर जोरदार टीका होत आहे.
काल युक्रेनमध्ये रशियाच्या हल्ल्यात कर्नाटकातील भारतीय विद्यार्थी ठार झाला. अजून किती विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत? किती विद्यार्थ्यांना वाचवले आहे? याची माहिती केंद्र सरकारने द्यावी असे राहुल गांधी यांनी भाजप सरकाकला विचारनी केली आहे.