काठमांडू : प्रवाशांनी भरलेल्या विमानाने उड्डाण केलं आणि त्यानंतर काही मिनिटांतच इंजिनमध्ये आग लागली. या विमानात 169 प्रवासी होते. या घटनेमुळे खळबळ उडाली. सगळ्या प्रवाशांनी आपला श्वास रोखून धरला होता. पुढे काय होईल याची भीती होती आणि गोंधळाचं वातावरण होतं.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर लगेचच दुबईतील विमानाच्या इंजिनला सोमवारी आग लागली. दुबईला जाणाऱ्या विमानाच्या इंजिनमध्ये आग लागल्याने हे विमान परतले.
लग्नावरुन परतताना पावसामुळे झाडाच्या आडोशाला थांबले अन्.. एकाच क्षणात चौघांचं कुटुंब संपलं
विमानाला विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आलं. काही वेळाने नेपाळच्या पर्यटनमंत्र्यांनी सांगितले की, विमानात आता सर्व काही ठीक आहे. विमान दुबईला रवाना झाले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर दुबईच्या फ्लाय प्लेनच्या इंजिनला आग लागली. या माहितीनंतर विमानतळावर अग्निशमन दलाच्या गाड्या सतर्क करण्यात आल्या. 50 नेपाळी प्रवाशांसह सुमारे 169 लोक विमानातून प्रवास करत होते.
कोहिनूरसहीत जगातील 7 दुर्मिळ हिऱ्यांची यादी, त्यांचा इतिहास फारच रंजक
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी काठमांडूच्या आकाशात विमानाला आग लागल्याचे पाहिले आहे. काठमांडू विमानतळावरून उड्डाण घेत असताना दुबईच्या विमानाला आग लागली.
याची माहिती मिळताच काठमांडू विमानतळावर विमान उतरवण्याचे प्रयत्न सुरू झाले. वैमानिकांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांची मदत घेऊन सिस्टिम नीट आहे का चेक केलं. त्यानंतर विमान पुन्हा दुबईसाठी रवाना झालं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.