मुंबई, 20 मे- जर तुम्ही विमानाने प्रवास केला असेल, तर प्रवासादरम्यान तुमचा सीट बेल्ट बांधा आणि मोबाईल फोन फ्लाइट मोडवर ठेवा, असं सांगताना फ्लाइट अटेंडंटला बघितलं असेल. आपल्या सर्वांच्या मोबाईल फोनमध्ये फ्लाइट मोडचा पर्याय असतो. फ्लाइट मोड ऑन करताच तुमच्या फोनचं नेटवर्क बंद होतं. असं केल्याने फोन चालू राहतो; पण त्याचं नेटवर्क बंद होतं. या दरम्यान आपण फोनमधील गॅलरीत आधीच डाउनलोड केलेले व्हिडिओ किंवा फोटो पाहू शकतो. पण नेटवर्क नसल्याने आपण कोणाशी फोनवर बोलू शकत नाही. विमानातील क्रू मेंबर्स विमान उड्डाणादरम्यान मोबाईल फ्लाईट मोडवर ठेवण्याची सूचना का देतात, असा प्रश्न अनेक लोकांच्या मनात येतो. आज आपण फ्लाईट मोड म्हणजे काय आणि विमान प्रवासात तो चालू न केल्यास काय होऊ शकतं हे जाणून घेणार आहोत.
फ्लाईट मोड म्हणजे काय?
प्रत्येक मोबाईल फोनमध्ये फ्लाईट मोड नावाचा एक ऑप्शन असतो. कॉलिंग आणि इंटरनेटसारख्या नेटवर्कशी संबंधित कामांसाठी या ऑप्शनचा वापर केला जातो. तथापि, फ्लाईट मोड चालू झाल्यानंतरही, आपण फोनमध्ये चित्रपट आणि व्हिडिओ पाहणं किंवा संगीत ऐकणं यासारख्या अॅक्टिव्हिटिज करू शकतो.
वाचा-Cannes 2023: भांगात कुंकू, भरजरी साडी नेसून पोहचली ‘ही’ अभिनेत्री
विमान प्रवासात फोन फ्लाईट मोडवर का ठेवावा?
विमान उड्डाणावेळी प्रत्येक प्रवाशाला मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवण्यास सांगितलं जातं. या संदर्भात क्रू मेंबर्सही प्रवाशांना सूचना देतात. खरं तर तुम्ही मोबाईल फोन फ्लाईट मोडवर न ठेवल्यास उड्डाणादरम्यान विमानाच्या नेव्हिगेशन सिस्टिममध्ये व्यत्यय येऊ शकतो. यामुळे विमान उड्डाणात अडचणी निर्माण होऊ शकतात.
विमान भरकटू शकतं
जर तुम्ही तुमचा मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवला नाही तर त्यामुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात. तुमच्या फोनचे सिग्नल विमानाच्या कम्युनिकेशन सिस्टिमला संभ्रमात टाकू शकतात. यामुळे वैमानिकाला कम्युनिकेशन करण्यात अडचण येईल तसंच कंट्रोल रुमशी संपर्क साधण्यात समस्या निर्माण होईल. अशा परिस्थितीत विमानाचा मार्गही भरकटू शकतो आणि अपघातही होण्याची शक्यता असते.
विमान क्रॅश होण्याचा वाढतो धोका
मोबाईलमधून निघणाऱ्या लहरी इतर ठिकाणच्या संपर्क यंत्रणेशी जोडू लागतात. अशा परिस्थितीत विमानाचा रेडिओ स्टेशनशी संपर्क तुटण्याचा धोका असतो. वैमानिकाला सूचना नीट ऐकू येत नाहीत. त्यामुळे योग्य सूचना न मिळाल्याने विमान कोसळण्याची शक्यता वाढते. त्यामुळे प्रवाशांनी विमान प्रवासादरम्यान आपला मोबाईल फोन फ्लाईट मोडवर ठेवणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.