मुंबई, 22 एप्रिल : मागील काही काळापासून खराब फॉर्मातून जाणारा केएल राहुल पुन्हा आपल्या चांगल्या फॉर्मात परतत आहे. राहुल आयपीएल 2023 मध्ये लखनऊ सुपर जाएंट्ससाठी जबरदस्त कामगिरी करीत असून, त्याने गुजरात टायटन्स विरुद्ध आक्रमक खेळी करताना विराट कोहलीचा विक्रम मोडीत काढला आहे.
आयपीएल 2023 मध्ये 30 वा सामना ऐकना क्रिकेट स्टेडियमवर गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जाएंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 135 धावा केल्या. तर लखनऊला विजयासाठी 136 धावांचे सोपे आव्हान दिले. यावेळी विजयाचे लक्ष पूर्ण करण्यासाठी कर्णधार केएल राहुल आणि काइल मेयर्स हे दोघे मैदानात उतरले.
के एल राहुलने आक्रमक फलंदाजी करताना अर्धशतकीय खेळी केली. त्याने केवळ 38 चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. एवढेच नाही तर यासह केएल राहुल याने आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. केएल राहुल टी 20 मध्ये केवळ 197 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या. यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर हा विक्रम होता त्याने 217 डावात 7 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. कमी डावात आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 7 हजार धावांचा टप्पा पूर्ण करणाऱ्यांच्या यादीत केएल राहुल तिसऱ्या स्थानी आहे. तर सर्वात जलद 7 हजार धावा करणाऱ्यांमध्ये प्रथम स्थानावर 187 डावांसह पाकिस्तानचा बाबर आजम तर 193 डावांसह ख्रिस गेल दुसऱ्या स्थानावर आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.