मुंबई, 5 एप्रिल : जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीग यास्पर्धेला सुरुवात झाली आहे. क्रिकेटच्या फॅन्सवर आयपीएलचा हा फिव्हर चढू लागला असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. याच दरम्यान मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी यांच्यात झालेल्या एका मॅचचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत विराटने रोहित शर्माच्या हेल्मेटवर बॉल मारण्याचा सल्ला आरसीबीच्या गोलंदाजाला दिल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे.
आयपीएल 2023 चा पाचवा सामना रविवारी 2 एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्या बंगळूरुच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर पारपडला. या सामन्यात आरसीबीने मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव केला होता. या सामन्यांदरम्यानची एक क्लिप सध्या व्हायरल होत असून यात ऐकू येत असलेल्या गोष्टीवर नेटकऱ्यांनी आक्षेप व्यक्त केला आहे.
झाले असे की, मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्यात टॉस जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मुंबई इंडियन्सकडून कर्णधार रोहित शर्मा आणि किशन हे दोघे फलंदाजीसाठी मैदानात उतरले. यावेळी एक ओव्हर झाल्यावर आरसीबीच्या एका खेळाडूने गोलंदाजी करत असलेल्या मोहम्मद सिराजला रोहित शर्माच्या हेल्मेटवर बॉल मारण्यास सांगितला. नेटकऱ्यांच्या मते हा आवाज स्टार फलंदाज विराट कोहलीचा असून विराट कोहली जाणून बुजून रोहितला इजा व्हावी यासाठी असा सल्ला देत होता.
— Main Dheet Hoon (@MainDheetHoon69) April 5, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.