मुंबई, 14 मे : प्रत्येक वर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार ‘मदर्स डे’ म्हणून साजरा केला जातो. जगभरात यादिवशी प्रत्येक मुल आपल्या आईप्रती आपल्या भावना प्रेम व्यक्त करत असतो. अशाचवेळी भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने आपली आई सरोज आणि पत्नी अनुष्का शर्मा या दोघींना मदर्स डे च्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आयपीएल 2023 मध्ये विराट कोहली सध्या आपल्या फलंदाजीने धुमाकूळ घालत आहे. काहीच दिवसांपूर्वी विराटने आयपीएल कारकिर्दीत 7 हजार धावांचा टप्पा ओलांडून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे. आज विराट कोहली ज्या उंचीवर आहे त्यात त्याची आई सरोज यांचा मोलाचा वाटा असल्याचे त्याने यापूर्वी अनेक मुलाखतीत सांगितले. तर विराट क्रिकेटमध्ये खराब फॉर्मातून जात असताना त्याची पत्नी अनुष्का शर्मा हिने देखील त्याची खंबीरपणे साथ दिली. तेव्हा आपली आई सरोज आणि पत्नी अनुष्का शर्मा या दोघींना मदर्स डेच्या शुभेच्छा देताना विराटने दोघींसोबतचे काही खास फोटो शेअर केले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.