मुंबई : आयपीएलच्या प्लेऑफसाठी चुरशीचे सामने झाले. प्लेऑफमध्ये जाण्याच्या RCB च्या सगळ्याच आशा मावळल्या. मुंबई टीमने प्लेऑफमध्ये धडक दिली आहे. रविवारी झालेल्या सामन्यादरम्यान टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला दुखापत झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचे सामने अगदी तोंडावर आले आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना 7 जून ते 11 जून दरम्यान इंग्लंडमधील केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्याआधीच विराट कोहलीला दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
टीम इंडियाचा सर्वात उत्तम क्रिकेटर जखमी झाला असून आता टीम इंडियाची आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची स्वप्न भंग होणार का अशी चिन्हं दिसत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि गुजरात टायटन्स यांच्यातील IPL सामन्यादरम्यान विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.
IPL 2023 RCB vs GT : विराट कोहलीने लावली शतकांची माळ; मोडला ख्रिस गेलचा रेकॉर्ड
विराट कोहली विजय शंकरने मारल्या बॉलला कॅच पकडण्यासाठी गेला, त्यावेळी त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. मैदानात फिजियोथेरपिस्ट आले. त्यांनी कोहलीला मदत करून मैदानाबाहेर आणलं. विराट कधीपर्यंत मैदानात परतेल याबाबत अजून कोणतंही व्यक्तव्य करण्यात आलं नाही.
विराटचं शतक, पण स्विगीचा नवीन उल हकवर निशाणा, वाद पुन्हा उफाळणार?
मंगळवारी टीम इंडियाचे खेळाडू इंग्लंडला जाण्यासाठी रवाना होणार आहेत. आधीच टीम इंडियातून पाच खेळाडू दुखापतीमुळे बाहेर गेले आहेत. त्यामध्ये ऋषभ पंत, बुमराह, जयदेव उनादकट सारख्या खेळाडूंची नावं आहेत. त्यामुळे आता विराट कोहलीच्या हेल्थबाबत काय अपडेट येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.