मुंबई, 15 एप्रिल : भारताचा माजी कर्णधार आणि आयपीएलमधील आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विराट कोहली मैदानावर कधी चौकार षटकारांची आतिषबाजी करून तर कधी डान्स करून त्याच्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. अशातच मैदानावरील विराट कोहलीचा धम्माल डान्स पाहून विराटला बॉलिवूड चित्रपटात आयटम नंबर करण्याची ऑफर मिळाली आहे.
विराट कोहली ने नुकतेच आयपीएल 2023 मधील त्याचे तिसरे अर्धशतक ठोकले आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चिन्नस्वामी स्टेडियमवर विराटने 34 चेंडूत 50 धावा केल्या, यासह त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये 200 धावांचा टप्पा ओलांडला आहे. विराट त्याच्या जबरदस्त खेळी सोबतच त्याच्या हटके डान्समुळे मैदानावरील प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये कोहली डान्स पाहायला मिळाला नसला तरी काही दिवसांपूर्वी त्याने शाहरुख खान सोबत झुमे जो पठाण गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओ व्हायरल झाला होता.
विराट कोहलीचे हे डान्स व्हिडिओ पाहून त्याला आता बॉलिवूडचा अभिनेता कमाल आर खान उर्फ केआरके याने विराटला त्याच्या हिंदी चित्रपटात डान्स नंबर करण्याची ऑफर दिली आहे. तो सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या विराट कोहलीच्या एका व्हिडिओमुळे खूपच इम्प्रेस झाला. त्याने व्हिडिओ शेअर करत लिहिले, “मी विराट कोहलीचा डान्स पाहून खूप प्रभावित झालो आहे. म्हणून मी त्याला माझ्या देशद्रोही 2 चित्रपटात आयटम नंबर करण्याची ऑफर देतो”. यासह केआरकेने हसणारे इमोजी लावले आहेत.
I am very impressed by @imVkohli dance skills, hence I offer him an item number in my film #Deshdrohi2! pic.twitter.com/E51wZD8m3i
— KRK (@kamaalrkhan) April 14, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.