हैदराबाद, 19 मे : आयपीएलमध्ये सनरायजर्सविरुद्धच्या सामन्यात विराटने शतक झळकावलं. सनरायजर्स हैदराबादने दिलेलं 187 धावांचं आव्हान गाठताना विराटने आय़पीएल कारकिर्दीतलं सहावं शतक केलं. त्याच्या शतकाच्या आणि फाफ डुप्लेसिच्या अर्धशतकाच्या जोरावर आरसीबीने सामना 8 गडी राखून जिंकला. यासह आरसीबीच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशाही जिवंत आहेत.
विराट कोहली त्याच्या यशाचं श्रेय नेहमीच पत्नी अनुष्का शर्माला देतो. गुरुवारी रात्री सामना जिंकल्यानंतर विराट कोहलीने मैदानावरूनच पत्नी अनुष्का शर्माला व्हिडीओ कॉल केला. त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Virat on a Video call with Anushka ❤❤❤ pic.twitter.com/gLUIp7UEUT
— Shreya ❤ (@Shreyaztweets) May 18, 2023
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.