गणेश दुडम, प्रतिनिधी
मावळ, 14 एप्रिल : वीक एण्डला मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर गाड्यांची प्रचंड गर्दी असते, त्यामुळे या शनिवार-रविवारसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्यामुळे अवजड वाहनंदेखील या मार्गावर आल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागेल, त्यामुळे शासनाने एक्स्प्रेस वेवर अवजड वाहनांना बंदी कली आहे.
शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून रविवारी 16 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना एक्स्प्रेस वे वर बंदी घालण्यात आली आहे.
तुमच्या शहरातून (पुणे)
आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा सोहळा नवी मुंबईमध्ये पार पडणार आहे, या सोहळ्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने एक्स्प्रेस वेवर शनिवारी दुपारी 2 वाजल्यापासून ते रविवारी रात्री 11 वाजेपर्यंत 16 टनपेक्षा जास्त वजन असणाऱ्या अवजड वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.
एक्सप्रेस वे, जुना पुणे मुंबई महामार्ग, मुंबई गोवा महामार्ग आणि नवी मुंबई कडे जाणारे सर्व भागातील रस्त्यांवर हा नियम लागू राहणार आहे.
हार्बरचा मेगाब्लॉक रद्द
रविवारी 16 एप्रिल रोजी आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात आला होता. हा मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.