नवी दिल्ली, 18 एप्रिल: सोशल मीडिया हे मनोरंजनाचं मोठं साधन बनलं आहे. लोक आपला बराचसा वेळ सोशल माध्यमांवर घालवताना दिसतात. अनेक निरनिराळे व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालताना दिसतात. यामध्ये अनेक मजेशीर, भावुक, विचित्र, धक्कादायक व्हिडीओ पहायला मिळतात. असे अनेक व्हिडीओ असतात जे पाहून मन खूश होतं. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो पाहून तुम्ही भावुक आणि आनंदी व्हाल.
एक सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. ज्यामध्ये एका वृद्ध जोडप्यामधील प्रेम पाहून तुम्हीही भावूक व्हाल. त्याचबरोबर या व्हिडिओने सोशल मीडियावर लाखो युजर्सचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ नेमका काय आहे याविषयी जाणून घेऊया.
हेही वाचा – नवरीच्या मेव्हण्याने केली चेष्टा; नवरदेवाने वाजवली कानाखाली, स्टेजवरील हाणामारीचा Video व्हायरल
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वृद्द कपल दिसत आहे. पती आपल्या वृद्ध पत्नीला हाताने खायला भरवत आहे. हृदयाला भिडणारा हा व्हिडीओ सध्या सगळ्यांचं लक्ष वेधत असून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आजारपणामुळे पत्नीला जेवन करता येत नसल्यामुळे पती तिला स्वतःच्या हाताने भरवत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.