मुंबई, 21 मे : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून आतापासून उमेदवार चाचपणी सुरु झाली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा भाजपचा प्लॅन ठरला आहे. वेळ पडल्यास इतर पक्षाचे पदाधिकारी फोडण्याचे आदेश देण्यात आले असून मुंबई पक्षवाढीसाठी भाजपचा इतर पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर डोळा असल्याचे दिसत आहे.
देशातील सर्वात महत्त्वाची मुंबई महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजपने आतापासूनच मोर्चेबांधणी सुरू केली आहे. यासाठी भाजपने रणनीती आखली असून मुंबईत सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्र काम करण्याचे आदेश दिले आहेत. मोदी@9 कार्यक्रम स्थानिक लोकापर्यंत घेऊन जाण्यासाठी मुंबईत भाजप घर घर अभियान राबवणार आहे. पालिका निवडणुकीआधी सर्वसामान्य जनतेसोबतचा संपर्क वाढावण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांचा पालिकेतील कारभाराची पोलखोल करण्याचेही आदेश पदाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
भाजपा नेते प्रवीण दरेकरांचे भाजपा कार्यकर्त्यांना खडे बोल
तीन दिवसापूर्वी पुण्यामध्ये भाजपा प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. त्यानंतर आज मुंबईत भाजपा मुंबई प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. ही बैठक मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक म्हणून समजली जाते. मात्र, आजच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी नाराजी व्यक्त केली.
सहकार विभागाविषयी मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांचा समन्वय नाही. मध्यंतरी गोरेगाव येथे सहकार विभागातर्फे गृहनिर्माण संस्थाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांनी सहकार च्या कार्यक्रमाकडे दुर्लक्ष केलं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थित गृहनिर्माण संस्थाचा डेटा मागवला नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अलर्ट राहणं गरजेचं आहे गृहनिर्माण ची मते हि मोठ्या प्रमाणात आणि महत्वाची आहे त्यामुळे तो डेटा घेणे त्यांच्याशी संवाद साधणे. त्याचं मतात रुपांतर करणे त्यांना प्रेरित करणं त्यांना आपल्या योजना पोहोचवणं हे तितकंच गरजेचं असल्याचे दरेकर म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.