मुंबई, 03 एप्रिल : आयपीएलच्या १६ व्या हंगामाला सुरुवात झालीय. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सकडून दिल्ली कॅपिटल्सला पराभव पत्करावा लागला. दरम्यान, या सामन्यावेळचे डेव्हिड वॉर्नरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याच्या शूजवर असलेल्या फोटोंची चर्चा होत आहे.
डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतो. कधी मुलांसोबत डान्स करताना दिसतो तर कधी त्यांच्यासोबत क्रिकेट खेळताना दिसतो. सध्या आयपीएलमुळे जवळपास महिनाभर वॉर्नर कुटुंबापासून दूर आहे. कुटुंबाबद्दल असलेलं प्रेम त्याने अनोख्या पद्धतीने दाखवलं आहे. त्याच्या शूजच्या मागच्या बाजूला तीन मुली इवी, इंडी आणि इस्ला यांची नावे लिहिली आहेत. तर एका बाजूला पत्नीचे नाव लिहिलेय. त्याच्या शूजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
IPL 2023 : टेनिस ग्रँड-स्लॅम ते आयपीएल एँकर, तनवी शाहचे ग्लॅमरस Photo
लखनऊने दिल्ली विरुद्धच्या सामन्यात १९२ धावा केल्या होत्या. यात काइल मेयर्सने ३८ चेंडूत ७३ धावांची वेगवान खेळी केली होती. लखनऊने दिलेलं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्लीची फलंदाजी ढेपाळली होती. मात्र कर्णधार डेव्हिड वॉर्नरने जबरदस्त अर्धशतक झळकावलं होतं. मात्र तरीही संघाला पराभूत व्हावं लागलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.