नवी दिल्ली 01 मे : कधी कधी असे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात , जे पाहून युजर्सच्या अंगावर काटा येतो. आजकाल एका व्यक्तीचा असाच व्हिडिओ नेटकऱ्यांना घाम फोडत आहे. व्हिडिओ यूजर्सच्या घशाला कोरड घालताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती डोळ्याची पापणी मिटण्याच्या आत एका विशालकाय अजगराचं तोंड पकडतो आणि त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करताना दिसतो. त्याचवेळी अजगरही या व्यक्तीला सामोरे जाण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
सहसा बरेच लोक जंगल सफारीदरम्यान काही भयानक प्राण्यांचे फोटो काढताना आणि व्हिडिओ बनवताना दिसतात. असेही काही लोक आहेत जे जंगलात जात काही आश्चर्यकारक पराक्रम करतानाही दिसतात. नुकताच एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक माणूस घाबरून पळून जाण्याऐवजी जंगलात एका मोठ्या आणि अवाढव्य अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. हे पाहून युजर्सलाही धक्का बसला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.