मुंबई, 19 मे: व्हॉट्सअॅप हे अत्यंत लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. साध्या मेसेजेसपासून फोटो, व्हिडिओ, फाइल्स, लिंक्स, लोकेशन आणि व्हॉइस मेसेजेस असं सारं काही व्हॉट्सअॅपवरून अगदी काही क्षणांमध्ये शेअर करता येतं. शिवाय हे अॅप वापरायला सोपं असल्याने सर्व वयोगटांतल्या व्यक्ती ते वापरू शकतात. त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढली आहे आणि ती दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. या व्हॉट्सअॅपच्या काही सिक्रेट ट्रिक्सबद्दल जाणून घेऊ या.
व्हॉट्सअॅपवरून इतरांना मेसेज पाठवता येतो, हे आपल्याला माहिती आहे. किंबहुना त्यासाठीच आपण व्हॉट्सअॅप वापरतो; मात्र त्यावरून स्वतःलासुद्धा मेसेज पाठवता येतात. त्यासाठी व्हॉट्सअॅप विंडो ओपन केल्यानंतर खाली उजव्या बाजूला असलेल्या मोठ्या मेसेज आयकॉनवर टॅप करावं आणि समोर दिसणाऱ्या यादीत स्वतःचं नाव दिसेल. त्या नावावर टॅप केल्यावर स्वतःलाच मेसेज पाठवता येतो. काही मेसेजेस आपल्याला संदर्भासाठी सेव्ह करून ठेवायचे असतील किंवा नंतर कोणाला तरी पाठवायचे असतील तर या चॅटचा वापर करता येतो. ड्राफ्ट म्हणून मेसेज टाइप करून ठेवण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो.
CNG भरताना लोक वाहनातून का बाहेर उतरतात? हा नियम नाही तर ही चार मोठी कारणे
चॅट्स दर ठरावीक दिवसांनी डिलीट करण्याची सवय अनेकांना असते. त्यात चुकून काही महत्त्वाचे मेसेजेसही डिलीट होऊ शकतात. म्हणून असे महत्त्वाचे मेसेजेस जपून ठेवायचे असतील, तर तो मेसेज स्टार करण्याची सोय व्हॉट्सअॅपमध्ये आहे. संबंधित मेसेजवर टॅप करून तो सिलेक्ट केल्यावर वर येणाऱ्या ऑप्शन्समध्ये स्टार हाही एक ऑप्शन असतो. त्यावर टॅप केल्यावर तो मेसेज सेव्ह होतो. चॅट डिलीट करताना स्टार्ड मेसेजेस डिलीट करावे की नाही असा एक पर्याय दिसतो. डिलीट न करण्याचा पर्याय निवडल्यास मेसेजेस कायम राहतात. सेटिंग्जमध्ये गेल्यावर ‘स्टार्ड मेसेजेस’ या ऑप्शनवर टॅप केल्यावर हे मेसेजेस उपलब्ध होतात.
व्हॉट्सअॅप चॅट किंवा ग्रुप चॅट आपल्याला म्यूटही करता येतं. तसंच आपल्याला नको असेल तितका वेळ चॅट हाइडही करता येतं. त्यासाठी चॅटवर लाँग प्रेस करावं आणि वर आलेल्या ऑप्शन्सपैकी म्यूट आयकॉन निवडावा. त्यानंतर त्या चॅटची नोटिफिकेशन्स येणार नाहीत. तसंच अर्काइव्ह हा ऑप्शन निवडला तर चॅट हाइड करता येतं.
व्हॉट्सअॅप ओपन केल्यानंतर मुख्य विंडोमध्ये वर असलेल्या सर्च बारच्या साह्याने अँड्रॉइड युझर्स आपल्याला हवा तो मेसेज सर्च करू शकतात.
आपलं प्रोफाइल पिक्चर आपल्या काँटॅक्ट्समधल्या सर्वांना दिसू नये अशी इच्छा असली, तर तशा प्रकारचं सेटिंगही व्हॉट्सअॅपमध्ये आहे. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन प्रायव्हसी या पर्यायावर टॅप करावं. त्यानंतर प्रोफाइल फोटो या पर्यायावर टॅप करून नंतर ‘माय काँटॅक्ट्स एक्सेप्ट’ या पर्यायावर टॅप करावं. त्यानंतर आपल्या काँटॅक्ट लिस्टमधल्या ज्यांना प्रोफाइल पिक्चर दिसू नये असं वाटतं, त्यांची नावं सिलेक्ट करावीत. त्यांना आपलं प्रोफाइल पिक्चर दिसणार नाही.
आपला ऑनलाइन प्रेझेन्सदेखील लपवणं व्हॉट्सअॅपमध्ये शक्य आहे. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन, प्रायव्हसी हा पर्याय निवडावा. त्यात ‘लास्ट सीन अँड ऑनलाइन’ हा पर्याय निवडावा. त्यानंतर ‘हू कॅन सी माय लास्ट सीन’ या प्रश्नासाठी ‘नोबडी’ हा पर्याय निवडावा. तसंच, ‘हू कॅन सी व्हेन आय अॅम ऑनलाइन’ या प्रश्नासाठी ‘सेम अॅज लास्ट सीन’ हा पर्याय निवडावा.
व्हॉट्सअॅपवरून पाठवलेल्या फोटोजची क्वालिटी खराब होते, हे आपल्याला माहिती आहेच. कारण ते फोटोज पाठवताना त्याचं रिझॉल्युशन कमी केलं जातं. तरीही आपल्याला चांगल्या क्वालिटीचे फोटोज पाठवणं शक्य असतं. त्यासाठी सेटिंग्जमध्ये जाऊन स्टोरेज अँड डेटा या पर्यायावर जावं. तिथे गेल्यानंतर फोटो अपलोड क्वालिटी या पर्यायामध्ये जाऊन ‘बेस्ट क्वालिटी’ हा पर्याय निवडावा.
व्हॉट्सअॅप युझर्सना त्यांची पर्सनल चॅट्स हाइड करायची असतील, तर चॅटवर लाँग प्रेस करून अर्काइव्ह बॉक्स आयकॉनवर टॅप करावं.
आता व्हॉट्सअॅपकडून एक नवं फीचर लवकरच उपलब्ध होणार आहे. त्याच्या साह्याने युझर्सना आपली सुपर पर्सनल चॅट्स लॉक करता येतात. कंपनीने ही सुविधा रोल-आउट करायला सुरुवात केली आहे. प्रत्येक चॅटच्या प्रोफाइल सेक्शनमध्ये हा पर्याय उपलब्ध होईल.
त्याशिवाय व्हॉट्सअॅपला फिंगरप्रिंट लॉक करण्याची सोयही उपलब्ध आहे. त्यामुळे फोन दुसऱ्या कोणाच्या हातात दिला, तरी त्यातली व्हॉट्सअॅप चॅट्स कोणीही वाचू शकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.