रामकुमार नायक (दुर्ग), 19 एप्रिल : छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यात एक मोठे सेक्स रॅकेट उघडकीस आले आहे. काही व्यक्ती जाळ्यात अडकणाऱ्यांना फोन आणि व्हॉट्सअॅपवर संपर्क साधून मुलींसोबत अश्लिलतेसाठी व्यवहार करायचा. दुर्ग शहरातील सूर्या मॉलमधील एसेन्स स्पा सेंटरमध्ये हे रॅकेट चालवले जात होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच छापा टाकून कंडोमची पाकिटे, मोबाईल आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.
दुर्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मृतीनगर येथील सूर्या मॉलच्या एसेन्स स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविला जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून भिलाई नगरचे सीएसपी निखिल राखेचा यांच्या नेतृत्वाखाली स्मृती नगर चौकी पोलिसांच्या पथकासह विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर एका हवालदाराला ग्राहक म्हणून घटनास्थळी पाठवण्यात आले.
मोठी बातमी! नाशिकमध्ये विहीर खोदताना भीषण स्फोट; 3 मजुरांचा जागीच मृत्यू
ग्राहक म्हणून पोचलेल्या पोलीस अधिकाऱ्याने काउंटरवर बसलेल्या ऑपरेटर शारिक खानशी बोलून मुलीची व्यवस्था करण्यास सांगितले. मुलगी दाखवून ऑपरेटरने पंधराशे रुपयांचा सौदा केला. त्याचवेळी स्पा चालकाने त्या पोलिसाला एका खोलीत नेले आणि तरुणीला त्याच्यासोबत पाठवले. काही वेळाने, ग्राहक बनलेल्या पोलिसाने बाहेर थांबलेल्या पोलिसांकडे हातवारे करून त्यांना आत बोलावले.
स्पामध्ये पोलिसांचा ताफा पाहून ऑपरेटर आणि ग्राहक इकडे तिकडे धावू लागले, यावेळी एकच गोंधळ उडाला होता. पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून पकडले. पोलिसांचे पथक कारवाई करत होते त्यावेळी खोल्यांमध्ये अनेक महिला व पुरुष निंदनीय अवस्थेत आढळून आले. यावेळी पोलिसांनी 8 मुलींची सुटका केली. तर स्पा सेंटरचे संचालक शारिक खान यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींचे फोटो व्हॉट्सअॅपवर ग्राहकांना पाठवले जात होते. फोटो पाठवल्यानंतर ग्राहकाने मुलींना पसंती दिली की, डील झाल्यानंतर ग्राहक वेळ काढून स्पा सेंटरमध्ये पोहोचायचे. रात्री उशिरापर्यंत स्पा सेंटरमध्ये लोकांची ये-जा सुरू असायची.
पोटात गर्भ वाढत असताना पतीने थेट पत्नीवर घातल्या गोळ्या…, कारण ऐकून बसेल धक्का
अटक केलेल्या दलालांनी पोलिसांना सांगितले की, ते ग्राहकांशी फोनवरून बोलायचे. रेट निश्चित झाल्यानंतर त्यांना पेटीएम, पे-फोन, गुगल पे यासह इतर माध्यमातून पैसे मिळायचे यावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.