पुणे, 9 एप्रिल, चंद्रकांत फुंदे : अदानी प्रकरणात जेपीसी नियुक्त करा अशी मागणी विरोधकांनी केली होती. काँग्रेस या विषयावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालं. मात्र अचानक शरद पवार यांनी जेपीसीची आवश्यकता नसल्याचं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उचंवल्या. दरम्यान याबाबत भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांना टोला लगावला आहे.
पवारांवर प्रतिक्रिया
शरद पवारांचा भाजपबाबतचा नूर अचानक पालटलाय, अजित पवार देखील नरमाईची भूमिका घेताहेत भाजप आणि राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? नेमकं कोण कोणाला डोळे मारतंय, असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांना विचारला असता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, माझं कोणाच्याही डोळ्याकडं लक्ष नाही. पुढच्या दीड वर्षात अनेक जण गळून पडतील. भाजपसोबत लढण ही सोपी गोष्ट नाही. खुद्द शरद पवार यांनी बाजू घेतली आणखी काय बोलणार.
तुमच्या शहरातून (पुणे)
विरोधकांना टोला
दरम्यान यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधला आहे. सर्व विरोधी पक्षांना आव्हान आहे की त्यांनी मुद्द्यावर लढले पाहिजे, अजित पवार यांना जे कळले ते बाकीच्यांना कधी कळणार असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. मविआ निवडणुका एकत्र लढेल की नाही याबाबत शंका आहे. ते एकत्र लढले तरी आम्हाला फायदा आहे, आणि ते वेगवेगळे लढले तरी भाजपला फायदा असल्याचंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.