मुंबई, 03 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे राजकारणात खळबळ उडाली असून नवीन अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली आहे. पण, आता खासदार सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा आघाडीवर आहे. आजच्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा झाली अशी माहिती खुद्द प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
राष्ट्रवादीची आज सकाळी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी सगळेच नेते हजर होते. पवार यांनी जी समिती नेमली होती त्या समितीची ही बैठक होती. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
पवार साहेबांच्या नेतृत्वामुळे देशात पक्ष वाढला आहे. देशभरात कार्यकर्ते हे त्यांच्या नावामुळे जोडले आहे. महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येणार नाही. आम्ही आज सांगतोय, त्यांनी ही निर्णय बदलावा. आमचा पहिला प्रयत्न आहे की, पवार साहेबांनी अध्यक्ष राहावं, लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनीच राहावं अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे, असंही पाटील म्हणाले.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मी राष्ट्रीय स्तरावर काम करण्यासाठी स्वत: ला पात्र समजत नाही. मला राज्यातच काम करायचं आहे. त्यामुळे पवारांनीच कायम राहावं अशी आमची मागणी आहे. त्यामुळे पर्यायी नावाचा विचार करणेही योग्य नाही, पक्षाचा जो निर्णय राहिल तो सर्वांनाच मान्य राहणार आहे. सुप्रिया सुळे यांच्या नावाची चर्चा ही पुढच्या पर्याय होऊ शकते, तो पर्याय राखून ठेवला आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
(New Ncp President : राष्ट्रवादीत घडणार मोठी घडामोड; पहिल्यांदाच होणार महत्त्वाचा निर्णय)
आम्ही सगळे एकत्र आहोत, कुणाचं नेतृत्व मान्य करू नये, असं काही नाही. पवार साहेबांनीच अध्यक्षपदी राहावं अशी सर्वांची मागणी आहे. देशभरात राष्ट्रवादी वाढवण्यासाठी आणि चर्चेसाठी शरद पवार साहेबांची गरज आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.
(राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट; बैठकीतून महत्त्वाची बातमी)
आपणच मला विचारलं मुंबईतली बैठक आहे, तुम्ही का आला नाही. मला अशी कोणतीही माहिती नव्हती. या बैठकीला मला बोलावलं नव्हतं. कदाचित या बैठकीला बोलावण्यासाठी येण्याची आवश्यकता नसेल. सर्वच बैठकींना हजर राहावं असं काही नसतं. पण त्याचा विपर्यास केला गेला, असा खुलासा जयंत पाटील यांनी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.