मुंबई, 10 एप्रिल : उद्योगपती गौतम अदानी यांची जेपीसीद्वारे चौकशी करुन उपयोग होणार नाही, असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केलं होतं. या वक्तव्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कधीकाळी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखालीच जेपीसी स्थापन केली होती. मीही त्याचा एक सदस्य होतो, अशी आठवण चव्हाण यांनी करुन दिली.
काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी व भाजपाचा खरपूस समाचार घेतला ते म्हणाले की, चोरांनाच टार्गेट केले जाते आणि अदानीला हिंडनबर्ग ने टार्गेट केले. जगातील दुसरा श्रीमंत व्यक्ती अडानींच्या कंपन्यांतील घोटाळा हिंडनबर्ग अहवालाने बाहेर काढला आहे. टाळेबंदात घोळ करून शेअर्सच्या किंमती कृत्रीमरित्या वाढवून लोकांना फसवले हे हिंडनबर्ग अहवालाने जगासमोर आणले. हिंडनबर्गच्या अहवालाला अदानी उत्तर देऊ शकले नाही, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु शकले नाही. अदानीचे 9 लाख कोटी रूपये पाण्यात गेले. जनतेच्या न्यालयात हिंडनबर्गला न्याय मिळाला. हिंडनबर्ग फ्रॅाड कंपन्यांना टार्गेट करते आणि सत्य बाहेर आणते. राहुल गांधींनी मोदी अदानींचे सत्य जगासमोर आणले.
वाचा – ‘बावनकुळे वेस्ट इंडिजचे ऍम्ब्रोस, उद्धव ठाकरे विकेट घेणार’, भास्कर जाधवांची जीभ घसरली
राहुलजींना लोकसभेत बोलू दिले जात नव्हते. इतिहासात सत्ताधारी पक्षाने कधी लोकसभेचे कामकाज बंद पाडले नव्हते, मोदींच्या काळात ते झाले. राहुलजींचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जंग जंग पछाडले कायदेशीर प्रक्रिया पायदळी तुडवून राहुलजींचा आवाज बंद करण्यासाठीच सदस्यत्व रद्द केले. अदानींच्या कंपन्यांमधील 20 हजार कोटी रुपये आले कुठून? जेपीसी हे सत्य शोधण्याचे संसदेच्या हातातील शस्त्र आहे, ती झालीच पाहिजे. 2003 साली शीतपेयांमधील कीटकनाशकांचे अंश सापडले होते यासंदर्भात शरद पवार यांच्या अध्यक्षतेखासी जेपीसीची स्थापना झाली होती. या समितीच्या अहवालामुळे आज शीतपेयाबाबतचे नियम कडक आहेत, याची आठवण पृथ्वीराज चव्हाण यांनी करुन दिली.
राहुल गांधींवर सुडबुद्धीने कारवाई : नाना पटोले
राहुल गांधी यांच्यावर भाजपा सरकारने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केली हे सर्वश्रुत आहे. यामागचा घटनाक्रम पाहिला तर ते सर्व स्पष्ट होते. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचे भाजपाचे प्रयत्न सुरु होते पण जुनी खोटी केस उकरून कारवाई केली गेली. देशात लोकशाही व्यवस्था व संविधान राहिलेले नाही. काँग्रेसला जनतेचा पाठिंबा वाढत आहे, त्याचा पक्षाला फायदा होणार आहे यासाठी भाजपाचा खोटारडा चेहरा जनतेसमोर आणण्याचा संकल्प आजच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत केलेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.