मुंबई, 02 मे : राज्याच्या राजकारणामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूकंप घडवला आहे. पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. सभागृहात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुरत हादरले आहे. ‘साहेब निर्णय मागे घ्या’ अशी घोषणाबाजीच सुरू केली, एवढंच नाहीतर कार्यकर्ते रडत शरद पवार यांच्यासमोर हात जोडून उभे आहे. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, यासाठी कार्यकर्ते एकच घोषणाबाजी करत आहे.
‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी राष्ट्रवादीचे सर्वसर्वा शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. कुठे थांबायचं हे मला कळतं, म्हणून एनसीपीच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार असल्याची घोषणा यावेळी शरद पवार यांनी केली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
त्यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यानंतर आता नवा अध्यक्ष कोण होणार यावरुन चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी अनेक खळबळजनक खुलासे केल्याची चर्चा आहे. या सोहळ्यात शरद पवारांच्या निवृत्तीच्या घोषणेमुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.