मुंबई, 3 मे : शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता पक्षात मोठी घडामोड पाहायला मिळत आहे. जितेंद्र आव्हाडांनी राष्ट्रीय सरचिटणीसपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान जयंत पाटलांनी NCP प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू होती. मात्र जयंत पाटलांनी राजीनाम्याच्या वृत्ताचं खंडन केलं आहे. सध्या तरी त्यांनी राजीनामा दिला नसल्याचं सांगितलं जात आहे.
जितेंद्र आव्हाडांसह ठाण्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मात्र राजीनामा दिल्याची माहिती आहे. शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केलानंतर नेत्यांसह कार्यकर्ते निराश झाल्याचं दिसून येत होतं. दरम्यान आज राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या राजीनामा सत्रानंतर हा गोंधळ अधिक वाढल्याचं दिसून येत आहे.
शरद पवार राजीनामा मागे घेणार का?
तुमच्या शहरातून (मुंबई)
बड्या नेत्यांसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा याची मागणी करीत आहे. असे असले तरी शरद पवार राजीनामा मागे घेणार नसल्याचं सूत्रांकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार याबाबत अनेक नावं समोर येत आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार सुप्रिया सुळे यांच्या नावाला पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी पसंती दर्शवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे याच आता राष्ट्रवादीच्या अध्यक्षा होण्याची शक्यता आहे. दरम्यान सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादीकडून अध्यक्षपदासाठी चार नावांची चर्चा आहे. ज्यामध्ये सर्वात आघाडीवर सुप्रिया सुळे यांचं नाव आहे, त्यानंतर छगन भुजबळ, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
New Ncp President : राष्ट्रवादीत घडणार मोठी घडामोड; पहिल्यांदाच होणार महत्त्वाचा निर्णय
राज्याची धुरा अजित पवारांकडे?
दरम्यान दुसरीकडे राज्याची धुरा अजित पवार यांच्या हाती सोपवण्यात येण्याची शक्यता आहे. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये प्राथमिक पातळीवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. तर दुसरीकडे वरीष्ठ नेत्यांची राष्ट्रीय पातळीवरील कोअर कमिटी करुन त्यात अजित पवारांसह अनेक वरीष्ठ नेत्यांचा समावेश करण्यावर ही प्राथमिक चर्चा झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.