पुणे, 27 एप्रिल : गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू आहे. अखेर यावर आता अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. मी ही चर्चा ऐकतो आहे. जेव्हा होईल तेव्हा होईल, अजून कोर्टाचा निर्णय बाकी आहे. कोर्टाचा निर्णय लागल्यावर काय होईल ते बघू असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी ते राज ठाकरे यांच्यावरही बोलले आहेत, जसं राज ठाकरे यांनी काकाकडे लक्ष ठेवलं, तसंच मीही काकाकडे लक्ष ठेवतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
शरद पवारांवर प्रतिक्रिया
तुमच्या शहरातून (पुणे)
दरम्यान मुंबईमधील एका कार्यक्रमात तव्यावरची भाकरी फिरवण्याची वेळी आली आहे. भाकरी फिरवली नाही तर ती करपते, विलंब करून चालणार नाही असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं, त्यावर देखील अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षात नवीन चेहेर असले पाहिजेत, तरुणांना संधी मिळाली पाहिजे या हेतूनं पवार साहेब बोलले असतील असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
जयंत पाटलांवर प्रतिक्रिया
जंयत पाटील हे देखील राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याची चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. याबाबत अजित पवार यांना विचारले असता त्यांनी जयंत पाटील यांना मुख्यमंत्रीपदासाठी शुभेच्छा म्हणत दोन शब्दात विषय संपवला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.