मुंबई, 8 एप्रिल: अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली होती. मात्र काँग्रेसला अडचणीची ठरेल अशी भूमिका आता शरद पवार घेताना दिसत आहेत. अदानी प्रकरणात जेपीसी स्थापन करण्याची काही गरज नाही, त्यांना जाणून-बाजून टार्गेट केलं जात असावं असं वाटतं असं पवार यांनी म्हटलं आहे. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेणार ? शरद पवारांच्या वक्तव्यामुळे मविआत फूट पडणार का? असा सवाल उपस्थित होत आहे. यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत
शरद पवारांच्या भूमिकेत काही नवीन नाही, पवारांच्या भूमिकेमुळे मविआत फूट पडणार नाही. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. शरद पवारांनी फक्त जेपीसी संदर्भात पर्याय सांगितलल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही जेपीसीचा अग्रह धरला होता असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर देखील निशाणा साधला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना अयोध्येचा रस्ता आम्ही दाखवला. पण आता गद्दारांना रामाचा आशीर्वाद मिळणार नाही, असा टोला सजंय राऊत यांनी लगावला आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
जेपीसीबाबत पवारांनी नेमकं काय म्हटलं?
जेपीसीत सत्ताधाऱ्यांचीच संख्या अधिक असेल त्यामुळे जेपीसी गठीत करून काहीच उपयोग नाही, 19 विरोधी पक्ष एकत्र आले तरी सर्वांना स्थान मिळणार नाही, त्यामुळे जेपीसीपेक्षा सर्वोच्च न्यायालयाची समितीच अधिक योग्य राहिल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसेच अदानी यांना जाणून-बुजून टार्गेट करण्यात येत आहे असं आम्हाला वाटत असल्याचंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.