मुंंबई, 24 एप्रिल : मोठी बातमी समोर येत आहे. एक मे रोजी मुंबईत महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. मात्र या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जाणार नसल्याचं समोर आलं आहे. शरद पवार मुंबईच्या वज्रमूठ सभेला जाणार नसल्यानं चर्चेचा उधाण आलं आहे. पवार सभेला का जाणार नाहीत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र राज्यातील नेते सभेला जात असल्यानं शरद पवार वज्रमूठ सभेला जाणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.
दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मविआबद्दल सूचक वक्तव्य केलं आहे. मविआ आज आहे, उद्या सांगता येत नाही. मात्र आमची एकत्र काम करण्याची तयारी आहे. जागावाटपाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीये, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्या या सूचक वक्तव्यामुळे काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेनेचं मात्र टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. पवार यांनी हे विधान केलं आहे आणि त्यानंतर लगेचच ते वज्रमूठ सभेला हजर राहणार नसल्याची बातमी समोर आल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
संजय राऊतांचा गौप्यस्फोट
दरम्यान दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सत्ता स्थापन्यासाठी भाजपला त्यांची गरज होती. मात्र आता गरज संपली असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.