मुंबई, 5 मे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली. यावेळी पक्षातील सर्व मुख्य नेते, आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, राष्ट्रावादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार या पत्रकार परिषदेला अनुपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात मंगळवारी (2 मे) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. यानंतर पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला. अनेक नेते आणि कार्यकर्त्यांना तर सभागृहातच अश्रू अनावर झाले. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्वजण करत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.
शरद पवार यांच्यासोबत पत्रकार परिषदेला उपस्थित नेते
तुमच्या शहरातून (मुंबई)
रोहित पवार
प्रफुल पटेल
जयंत पाटील
अनिल देशमुख
विद्या चव्हाण
नरहरी झिरवळ
के थॉमस
पवारांचा कार्यकर्त्यांना संकेत
शरद पवार यांनी काल (4 मे) यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली होतील. यावेळी कार्यकर्त्यांनी तुम्हीच अध्यक्षपदी राहावे, बाकी तुमचे सर्व निर्णय मान्य असल्याची भूमिका मांडली. यावर पवारांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. मी घेतलेला निर्णय पक्षाच्या भवितव्यासाठी घेतला आहे. उद्या पक्षाचे काम कसे चालणार, यासाठी निर्णय घेतला आहे. पण ही गोष्ट खरी आहे, असा निर्णय घेत असताना आधी सहकाऱ्यांची चर्चा करावी लागते. पण मला खात्री होती, मी तुम्हा लोकांशी चर्चा केली असती तर तुम्ही मला कधीच ‘हो’ म्हटलं नसतं. मी तुम्हाला विश्वासात घेवून निर्णय घेतला पाहिजे होते ते मी केले नाही ही माझी चूक होती, अशी कबुली पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांसमोर दिली. त्यानंतर तुमच्या मनासारखा निर्णय घेऊ असं आश्वासन पवारांनी कार्यकर्त्यांना दिलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.