मुंबई,ता.१५
नवी मुंबईतील रबाळे इथे शिवकृपा सहकारी पतपेढीच्या ‘शिवकृपा भवन’ या नवीन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून पतपेढीच्या सर्व सदस्यांना शुभेच्छा दिल्या.
सुमारे ४० वर्षांच्या संस्थेच्या वाटचालीत संस्थेच्या १०० शाखा स्थापन झाल्या असून ७५० पेक्षा अधिक कर्मचारी इथे कार्यरत आहेत. संस्थेने सहकार क्षेत्रात आपले योगदान देत राहावे आणि तिची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहावी, अशा सदिच्छा व्यक्त करतो.
आज या देशाच्या अर्थकारणातील एक प्रमुख क्षेत्र म्हणून नवी मुंबईचा उल्लेख केला जातो. इथे साताऱ्यातील प्रामुख्याने कोरेगाव तालुक्यातील कष्टकरी वर्ग आणि ग्रामस्थ कामासाठी येतात. त्यांच्या अर्थकारणाला एक स्थिरता मिळावी म्हणून ही नवीन वास्तू आपण समर्पित करत आहोत ही फार अभिमानाची गोष्ट आहे.
मी कृष्णा शेलार व त्यांचे सहकारी, या वास्तूचे वास्तूविशारद आणि बांधकामाची जबाबदारी सांभाळणाऱ्या सर्वांना मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. या नव्या वास्तूतील सभागृहाला यशवंत सभागृह असे नाव द्यावे, अशी सूचना मी यानिमित्ताने करू इच्छितो.
रिझर्व्ह बँकेचा सहकारी बँकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडा मर्यादित आहे. त्यामुळे सहकारी बँकांना न्याय मिळत नाही, असे चित्र दिसते. जेव्हा केव्हा आम्हाला संधी मिळेल तेव्हा संसदेत यात सुधारणा व्हावी यासाठी प्रस्ताव मांडू, असे आश्वासनही यानिमित्ताने देतो.