मुंबई, 02 मे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे राष्ट्रवादीसह राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ‘शरद पवारांचा व्यक्तिगत निर्णय आहे, त्यांनी तो का घेतला, कशासाठी घेतला याबद्दल चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत यावर बोलणं उचित ठरणार नाही’ अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
‘लोक माझा सांगाती’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अध्यक्षपदावरून पायउतार होण्याची घोषणा केली. त्यांच्या या निर्णयावर फडणवीस यांनी मोजक्यात शब्दांत प्रतिक्रिया दिली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
(पवारांचा राजीनामा, कार्यकर्ते उपोषणाला, सुप्रिया सुळेंचं रस्त्यावर येऊन आवाहन, Video)
‘मला याची कल्पना नाही. हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यावर आता बोलणं योग्य राहणार नाही. हा पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच पक्ष कुठे चालला आहे, त्यावर आता बोलणार नाही, आम्ही परिस्थितीवर नजर ठेवून आहे. योग्यवेळी आम्ही बोलू. नेमकं काय घडत आहे, कशासाठी घडत आहे, हे चित्र स्पष्ट झाल्यानंतर बोलणार आहे’ अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली.
‘मी पवार साहेबांचं पुस्तक वाचलं नाही. मलाही एक पुस्तक लिहिणार आहे. योग्य वेळी मी लिहिणार आहे, मला काय वाटतं, सत्य काय आहे, त्यावेळी पुस्तकात स्पष्ट करेन, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
(दादा-ताईंनी समजावल्यानंतरही कार्यकर्ते ऐकेना, अखेर पवारांचा फोन आला अन्…Video)
दरम्यान, ‘निवृत्तीचे काय संकेत दिले याबद्दलची माहिती नाही. आपल्याच माध्यमातून बघितला आहे. राज्यसभेमध्ये तीन वर्षाचा कालावधी आहे. राज्यसभेचा कालावधी संपल्यानंतर लोकसभा राज्यसभा संसदीय कामकाज मध्ये सहभागी होणार नाही अशी स्पष्टता त्यांनी दिली. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते कधी निवृत्त होणार आहे, याची मला माहिती नाही पण राष्ट्रवादी पक्षाचा जो काही कारभार आहे. तो ज्येष्ठ राष्ट्रवादी नेत्यांच्या एक समिती करून साधारणतः सोपायचा विचार करत आहे, असं सांगतात. आज त्यांनी निवृत्ती घेतली का याचा अर्थ बोध होत नाही. कदाचित तीन वर्षांनी असू शकतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.