गंगटोक, 19 एप्रिल : एका कॅब चालकाने विद्यार्थीनीचा लैंगिक छळ करत धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आलीय. कॅब चालकानं ११ वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार केला आणि त्यानंतर गळा दाबून हत्या केली. सिक्कीमची राजधानी गंगटोकमध्ये ही घटना घडली असून यानंतर लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुलगी बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानतंर तीन दिवसांनी मुलीचा १४ एप्रिलला मृतदेह आढळून आला होता. या घटनेनंतर पोलिसांनी एकाला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुलीला ती शाळेतून घरी जात असताना लिफ्ट दिली होती. त्यानतंर ते एका पेट्रोल पंपावर थांबले. तेव्हा कॅब चालकाने तिच्यासाठी स्नॅक्स आणि ज्यूस खरेदी केलं. तिथून कॅब चालक जवळच्या जंगलात गेला आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला.
अनैतिक संबंधात नवरा ठरत होता अडथळा, बायकोने रचला डाव अन् प्रियकराच्या मदतीनं केलं भलतंच कांड
सिक्कीम पोलिसांनी आरोपीवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आईने आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केलीय. तिने म्हटलं की, माझ्या मुलीने जगण्यासाठी संघर्ष केला. मृत्यूआधी तिच्यावर अत्याचार केले गेले. आरोपीलासुद्धा मृत्यूची शिक्षा व्हायला हवी. आरोपीला आमच्याकडे सोपवलंत तर त्याला तडफडून मृत्यू देऊ असं म्हणत आईने संताप व्यक्त केला. पोलिस या प्रकरणी घटनेचा सखोल तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.