वेदप्रकाश (उत्तराखंड), 17 मे : उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून व्हिडिओ बनवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी दोराहा, बाजपूर येथील एका हॉटेलवर छापा टाकला आहे.
यादरम्यान हॉटेलच्या खोलीतून अल्पवयीन विद्यार्थिनी आणि एका तरुणाला आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. पोलिसांनी आरोपी तरुण आणि हॉटेलचालकासह तीन जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना मिळालेल्या गुप्तचरच्या माहितीवरून एका हॉटेलवर छापा टाकण्यात आला. यामध्ये दोघांना हॉटेलच्या खोलीतून आक्षेपार्ह अवस्थेत पकडण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
चौकशीदरम्यान अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यासाठी घरातून निघून गेल्याचे समजले. शाळेत जाण्याऐवजी ती त्या मुलाकडे पोहोचली आणि तो तिला हॉटेलमध्ये घेऊन गेला.
यावेळी अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान मुलाने जबरदस्तीने बलात्कार आणि मोबाईलवरून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी असलेल्या मोनिस याच्याविरुद्ध कलम 363, 376, 504, 506, 67 आणि पॉक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.