मुंबई, 3 एप्रिल : ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अरविंद सावंत यांच्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. शरद पवारांमुळे एकनाथ शिंदेंची मुख्यमंत्रीपदाची संधी हुकल्याचा अप्रत्यक्ष दावाच त्यांनी केला आहे. एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाला शरद पवारांचा विरोध होता. रिक्षावाल्याचं नेतृत्व कसं मान्य करणार? काँग्रेस राष्ट्रवादीकडे अनेक दिग्गज नेते आहेत, ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पदावर राहिले आहेत, मग हे सर्व नेते रिक्षावाल्याच्या हाताखाली काम करणार का? असं शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंना म्हटल्याचा दावा अरविंद सावंत यांनी केला आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी पवारांनीच उद्धव ठाकरेंना गळ घातल्याचंही सावंत यांनी म्हटलं आहे.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.