मुंबई, 18 एप्रिल : मुंबईतल्या चेंबूर इथे शिंदे गटाच्या शिवसेना शाखेवर कारवाई करण्यात आली आहे. शिवसेना शाखा क्रमांक 154 वर बीएमसीने हातोडा चालवला आहे. शिवसेनेच्या या शाखेवर मुंबई महापालिकेने बुलडोझर चालवून शाखा उद्धवस्त केली आहे.
शौचालयाच्या जागी शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाची शाखा होती. मुंबईतल्या एकनाथ शिंदेंच्या बांधण्यात आलेल्या पहिल्या शाखेपैकी ही एक शाखा होती. या शाखेला स्थानिकांनी आक्षेप घेतल्यामुळे ही कारवाई करण्यात आली.
तुमच्या शहरातून (मुंबई)
मुंबई महापालिकेवर सध्या प्रशासक आहे. मुंबई महापालिका आयुक्तच प्रशासकीय काम पाहत आहेत. महापालिका आयुक्त नगरविकास विभागाच्या अखत्यारीत येतं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच नगरविकास मंत्री आहेत, त्यामुळे महापालिकेने शिवसेना शाखेवर केलेल्या कारवाईमुळे चर्चांना उधाण आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.