गोविंद वाकडे, प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सराईत गुंडाने प्रवेश केल्याने पिंपरी-चिंचवडमध्ये खळबळ माजली. शहरातील कुख्यात गुंड प्रशांत दिघे याला शिवसेनेत प्रवेश देण्यात आला. दिघेविरोधात खून, खुनाचा प्रयत्न, मारमारी अशा 18 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आणि शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीमध्ये दिघेचा प्रवेश झाला.
प्रशांत दिघे याचा पक्षप्रवेश करून घेताना त्याचा सत्कारही करण्यात आला. तसंच त्याच्यावर युवासेना उपाध्यक्ष पदाची जबाबदारीही देण्यात आली होती. शिवसेनेमध्ये गुंडाला प्रवेश दिल्यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आणि प्रशांत दिघे याचा प्रवेश रद्द करण्यात आला.
तुमच्या शहरातून (पुणे)
पिंपरी-चिंचवडमधल्या काळेवाडी भागातील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती केल्यानंतर प्रशांत दिघेंचा पक्षात प्रवेश करून घेतला. प्रशांत दिघे यांची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती. प्रशांत दिघे यांचा शिवसेना प्रवेश स्थगित करत असून शिवसेना पक्षाशी काहीही संबध नसून ते पक्षाच्या कोणत्याही पदावर कार्यरत राहणार नाहीत, असं जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.