मुंबई, 3 एप्रिल : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ सुरतला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांच्या गाड्या अडवून चौकशी होत आहे. अशातच काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांची गाडी गुजरात पोलिसांनी अडवली. पोलीस आणि यशोमती ठाकूर यांच्यात बाचाबाची झाली. यावेळी यशोमती ठाकूर यांनी गुजरातमध्ये जाणाऱ्या दारुची देखील अशीच चौकशी केली जाते का? असा प्रश्न यावेळी पोलिसांना विचारला. तसेच एकनाथ शिंदेसोबत जेव्हा आमदार मुंबईतून सुरतला गेले होते तेव्हा त्यांची चौकशी केली होती का? असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. ठाकूर यांनी या घटनेचा व्हिडिओ तयार करुन आपल्या सोशल मिडियावर शेअर केला आहे.
काय आहे प्रकरण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात मोदी आडनावावरून झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी येणार होते. यासाठी देशभरातून काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुरतकडे रवाना झाले होते. महाराष्ट्रातूनही अनेक नेते गुजरातकडे निघाले होते. या नेत्यांच्या गाड्या गुजरात राज्याच्या सीमेवर आडवून त्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी पोलीस आणि यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक चकचक झाली. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरतला रवाना झाले होते, त्यावेळी अशीच चौकशी केली होती का? असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलिसांना केला.
राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ गुजरात ला जात असलेल्या आमदार आणि नेत्यांची गाड्या अडवून चौकशी होत आहे. राज्यातील शिंदे गटाचे आमदार सुरत ला रवाना झाले होते त्यावेळी अशीच चौकशी केली होती का असा सवाल माजी मंत्री आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड यशोमती ठाकूर यांनी गुजरात पोलीसांना केला. pic.twitter.com/xkoXGy1P9y
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 3, 2023
राहुल गांधी यांना जामीन मंजूर
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना मोदी आडनावाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्या प्रकरणी सूरत न्यायालयाने जामीन मंजूर केला. आता पुढील सुनावणी 13 एप्रिल रोजी होणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सूरत कोर्टात मोदी आडनावावरून झालेल्या शिक्षेविरोधात सोमवारी सूरत सत्र न्यायालयात याचिका दाखल केली. यात राहुल गांधी यांच्यावतीने दोन अर्ज दाखल करण्यात आले होते.
वाचा – अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार? बावनकुळेंचं सूचक वक्तव्य
पहिला अर्ज हा शिक्षेला स्थगितीसाठी होता. हा नियमित जामीन अर्ज आहे. तर दुसरा अर्ज हा शिक्षेला स्थगितीचा होता. राहुल गांधींचा पहिला अर्ज न्यायालयाने मंजूर केला. आता पुढील सुनावणी १३ एप्रिल रोजी होणार आहे. राहुल गांधींच्या दुसऱ्या अर्जावर न्यायालयाने मंजुरी दिली तर त्यांना पुन्हा खासदारकी मिळू शकते. मात्र यासाठी वेळ लागू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.