मुंबई, 23 एप्रिल : मोठी बातमी समोर येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पक्षाची बैठक बोलावली आहे. ही बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होणार आहे. आज रात्री नऊ वाजता या बैठकीला सुरुवात होणार आहे. या बैठकीला खासदार, आमदार, मंत्री आणि मुख्य पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक का बोलावण्यात आली याबाबतचं कारण अस्पष्ट आहे. मात्र या बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक विषयावर चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. मुख्यमंत्र्यांनी पक्षाची बैठक बोलावल्यानं चर्चेला उधाण आलं आहे.
आज उद्धव ठाकरेंची सभा
तुमच्या शहरातून (मुंबई)
दरम्यान दुसरीकडे आज जळगावमधील पाचोऱ्यात ठाकरे गट शिवसेनेची सभा होणार आहे. ही सभा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. या सभेत उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दुसरीकडे या सभेत भांडाफोड करणार असल्याचा इशारा संजय राऊत यांनी दिल्यानं सभेची उत्सुकता वाढली आहे.
भेंडवळच्या घटमांडणीत पहिद्यांदाच निघाला विंचू; राज्यात ‘या’ घडामोडी होण्याचं भाकीत
संजय राऊतांचा गौप्यस्फोट
दरम्यान सभेच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत हे आज जळगाव दौऱ्यावर आहेत. सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. हे सकार पुढील 15 ते 20 दिवसांत कोसळणार असल्याचं राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांना देखील जोरदार टोला लगावला आहे. गुलाबराव पाटील हे शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले, त्यामुळे त्यांनी आधी राजीनामा द्यावा असं राऊत यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.