ठाणे, 20 एप्रिल : राज्यात शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप सत्तेत एकत्र असली तरी ठाण्यात कार्यकर्ते मात्र विरोधात असल्याचे दिसत आहे. ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रवक्ते यांच्या विरोधात भाजप पदाधिकाऱ्याने फेसबुक पोस्ट टाकली. या पोस्टनंतर दोन गटात राडा झाला आहे. दोन्ही गट कोपरी पोलीस स्थानकामध्ये ऐकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोहचले होते.
काय आहे प्रकरण?
तुमच्या शहरातून (मुंबई)
ठाण्याचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या विषयी भाजप पदाधिकारी प्रमोद चव्हाण यांनी बुधाकरी फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले. यातून दोन गटात राडा झाला. यानंतर दोन्ही गट ऐकमेकांविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी कोपरी पोलीस स्थानकामध्ये गेले होते.
कोण आहेत नरेश म्हस्के?
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडून सूरतची वाट धरली तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले त्यांच्यासोबत अनेक आमदार गेले असले तरीही ठाण्यातून सगळ्यात आधी त्यांना आपला पाठींबा जाहीर करण्यात नरेश म्हस्के यांनी पुढाकार घेतला होता. त्यानंतर ठाणे शिवसेनेतील मंडळींना शिंदे यांच्यासोबत आणण्यात देखील त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पडली होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर चहूबाजूंनी टीका होत होती, तेव्हा त्यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यासोबत ठाण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थनार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी तिथे नरेश म्हस्के त्यांच्यासोबत होते. यावेळी नरेश म्हस्के यांनी जाहीर भाषणात एकनाथ शिंदे यांना साथ दिल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदासह शिवसेनेतून हकालपट्टी केली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री होताच त्यांनी नरेश म्हस्के यांची ठाणे जिल्हाप्रमुख पदी पुनर्नियुक्ती केली. त्यानंतर त्यांना प्रवक्तेपदही दिलं आहे.
वाचा – नवी मुंबईत लोकांचे जीव जात असताना सत्ताधाऱ्यांचे ‘शाही’ भोजन; राष्ट्रवादीकडून तो फोटो ट्विट
ठाण्यातील आक्रमक चेहरा
दरम्यान नरेश म्हस्के हे शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून ठाण्यात ओळखले जातात. नरेश म्हस्के हे ठाण्याचे महापौर होते. आपल्या महापौरपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकदा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं. आता पुन्हा एकदा नवीन सरकारवर होत असलेली टीका पाहता म्हस्के यांना पुन्हा एकदा त्यांच भूमिकेत शिरुन विरोधकांना जशास तसं उत्तर देण्यासाठी सज्ज असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.