छत्रपती संभाजीनंगर, 10 मे : सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या लागण्याची शक्यता आहे. न्यायलयात उद्या दोन महत्त्वाच्या प्रकरणांचा निकाल लागणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राजकीय पेचाबाबतच्याही केसचा समावेश आहे. सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी आज न्यायलयाच्या कामकाजावेळी हे संकेत दिल्याचेही सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मोठा दावा केला आहे. शिंदे गटातील एक मंत्री उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याचे सांगितले आहे.
शिंदे गटातील मोठा मंत्री आमच्या संपर्कात : खैरे
उदय सामंत हे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. कारण की शिंदे गटातील सर्वात शेवटी गेले आहेत. त्यामुळे ते 16 मध्ये आले नाही. यामुळे ते उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत. यांच्या गटातील अनेकजण आता फुटणार आहेत. त्यामुळे ते आमच्याकडे येऊ शकतात. उद्या काय परिस्थिती निर्माण होईल त्यावरून तेच होईल. मात्र, काही असो उद्धव ठाकरे यांचा मोठा विजय होईल, असा विश्वास शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला आहे.
तुमच्या शहरातून (छ. संभाजीनगर)
सत्ता संघर्षावर जी काही भूमिका आहे ती उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागेल. तज्ञ मंडळींनी सांगितले की निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार आहे. फडणवीस या गटाने धावपळ सुरू केली होती. यामुळे अनेकांनी अंदाज काढला. अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यामध्ये काहीतरी गडबड दिसते. यामुळे अधिकाऱ्यांमध्ये देखील ठाकरेंच्या बाजूने निकाल लागेल, असा अंदाज लावला आहे. याच्या आधारावर निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागणार असल्याचा दावा खैरे यांनी केला आहे.
वाचा – फडवीस-अजितदादांची जवळीक, शिंदे मात्र लांब!
मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देव भक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र, मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे. सत्ता संघर्षाच्या निकालानंतर जे जाणार आहे त्याच्यावर काय बोलायचं. उर्वरित आमदार जे आहे ते बाद होतील. मात्र, जे मस्तीत वागत होते. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्याबाबत काहीही बोलत होते. ती मस्ती लोकांना पटली नाही. ती मस्ती आता रिकामी होईल, असंही खैरे म्हटले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.